महत्वाच्या बातम्या

 तीन दिवसापासून अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष


- विविध मागण्यासाठी अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी बसले उपोषणाला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथील नगर पंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडून मंजुरी प्रदान केलेल्या अकृषिक आदेशानुसार नियम ब अटीचे उलघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच लेआऊट धारक आपापल्या लेआऊट मध्ये रस्त्यांचे कामाला सुरुवात केली नाही. त्या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यात आली नाही., तसेच प्रॉपर्टी कार्ड १ हजार ४०९ सीट क्र. ९ ची कायदेशीर करवाई करण्यात आली नाही. 

आदिवासीची प्रॉपर्टी गैर आदिवासीच्या खरेदी-विक्री करणे, भूमी अभिलेख अधिकारी एन.जी. पठाण यांच्या कार्यकाळात झालेल्या फेरपर व आलापली, नागेपली गावठाण बाबत चौकशी करणे, अहेरी येथील साझा क्र. १ मधील अतिक्रमण नोंदी व उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे नोंदींनीच्या सखोल चौकशी करणे, अहेरी येथील २०७ जमिनीचे हक्कदारचे  मय्यतनंतर खोटी संमती दाखवून पोटहिस्सा केलेल्या प्रकरणाची व मय्यत झालेल्या व्यक्तीला परत  जिवंत दाखवून एन.ए.पी ३४ करीता मागणी केलेल्या बाबतीत चौकशी करणे, तसेच अहेरी येतिल गावठान १९२१-२२ मध्ये असलेल्या सर्वेनुसार गावठान नकाशात नोंद असलेले रस्ते सन १९७४-७५ मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठान नकाशात ते रस्ते दिसून येत नसून ते गायब झाले. 

वरील सर्व  मागण्यांच्या घेवून अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी तीन दिवसापासून उपोषणाला बसले असून तीन दिवसापासून पोलीस कर्मचारी उपोषण स्थळी भेट देत आहेत, मात्र संबंधित प्रशासन विभागाचे कर्मचारी अधिकारी याकडे कानाडोळा (दुर्लक्ष) करत आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos