कमलापूर येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा उत्साहात, अपंगांना विविध साहित्यांचे केले वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कमलापूर :
अखिल नाट्य क्रीडा कला व सामाजिक संघटना कमलापूरच्या वतीने राज्यस्रतीय नृत्य स्पर्धा ५ जानेवारी रोजी समाज मंदिराच्या पटांगणावचर आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अपंगांना तसेच नागरीकांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.
नृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माजी आ. दीपक आत्राम यांच्याकडून ३० हजार १ रूपये ठेवण्यात आले होते. द्वितीय पारितोषिक जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून २० हजार १ रूपये, तृतीय पारितोषिक पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम यांच्याकडून १५ हजार १ रूपये, चतुर्थ पारितोषिक १० हजार १ रूपये जि.प. च्या बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्याकडून, पाचवे पारितोषिक ५  हजार १ रूपये जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून, सहावे पारितोषिक पंचायत समिती सदस्य भाष्कर तलांडी यांच्याकडून तर सातवे पारितोषिक २ हजार १ रूपये पं.स. सदस्य भाष्कर तलांडी यांच्याकडून देण्यात आले. 
स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. दीपक आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून सभापती जयसुधा जनगाम, जि.प. सदस्य अजय नैताम, जि.प. सदस्या अनिताताई आत्राम, जि.प. सदस्या सुनिताताई कुसनाके, जि.प. सदस्या सरीता तैनेनी, जि.प. सदस्या सारीकाताई आईलवार, पं.स. सभापती सुरेखाताई आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, कमलापूरच्या सरपंचा रजनीताताई मडावी, उपसरपंच शंकर आत्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अपंगांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मान्यवरांनी उपक्रमांचे कौतुक केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-06


Related Photos