महत्वाच्या बातम्या

 अवैध दारू तस्करी विरोधात पोस्टे देसाईगंज पोलीसांनी केले दारू विक्रेत्यावर कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथुन देसाईगंजकडे जुनी वडसा रोड मार्गे आंबेडकर वार्ड येथे १३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी एक फिक्कट गोल्डन रंगाची मारुती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारुची वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे क्रॉसिंग ते जुनी वडसाकडे जाणाऱ्या रोड दरम्यान तात्पुरती नाकाबंदीचे प्रयोजन करुन पाळत ठेवली असता एक फिक्कट गोल्डन रंगाची चारचाकी वाहन समोरुन संशयास्पद येतांना दिसल्याने सदर वाहन जवळ येताच चालकास हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केले, असता वाहन चालकाने त्यांच्या ताब्यातील गाडी रोडकडेला थांबविले.

सदर वाहन क्र. एम. एच. ३१ सि. पी. ८१७६ या गाडीच्या मागील डिक्कीमध्ये खालील वर्णानाचा व किंमतीचा माल मिळुन आला असुन वाहन चालकास व गाडीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या इसमांना प्रथम गाडीचे खाली उतरवुन पंचसमक्ष प्रोव्ही बाबत गाडीची पाहणी केली असता आरोपी कडुन मिळालेला माल १६ खर्ड्याच्या बॉक्स मध्ये देशी दारू संत्री कंपनीच्या ९० मि.ली. मापाच्या प्रत्येक बॉक्समध्ये १०० निपा असा एकुण १ हजार ६०० निपा, किंमत ८० रु. प्रत्येकी १ लाख २८ हजार रुपयांचा माल मिळुन आला. व एक जुनी मारोती सुझुकी कंपनीची गोल्डन रंगाची चारचाकी वाहन किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये असा एकुण ३ लाख ७८ हजार रुपयाचा माल ताब्यात घेण्यात आला.

सदर आरोपी रॉबिनसिंग महेंद्रसिंग बावरी (२०), मिथुन भाऊराव नागापुर (२४), हे दोघे रा. आंबेडकर वार्ड देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन यांच्या विरोधात अपराध क्र. ००९७/२०२३ १३ एप्रिल २०२३ कलम, ६५ (अ), ८३, ९८ (२) मदाका, सहकलम १३० ( १ ) / १७७, १४६/१९६ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला, असुन गुन्हांच्या तपास पोस्टे देसाईगंज येथील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक प्रशासन कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक रासकर, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार, कुमोटी, ढोके यांनी केकेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos