महत्वाच्या बातम्या

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वाहिली मानवंदना


- बाबू आपले बाबासाहेब शिकले म्हणून तू बी शिक : माजी मंत्री राजकुमार बडोले 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया (सडकअर्जुनी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी कोहमारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. दरम्यान माजी मंत्री राजकुमा बडोले यांनी महामानवाच्या जिवन कार्याच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांशी संवाद साधले. सोबतच आपल्या जनसंपर्क कार्यालय येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करणारे समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे महामानव, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबू आपले बाबासाहेब शिकले म्हणून तू बी शिक

राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपला लहानपणीचा अनुभव सोशल मिडीयावर शेयर केला आहे. यात त्यांची आई त्यांना शिक्षणाबाबत काय म्हणाली याची पोस्ट माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सोशल मिडियावर केली आहे.

बाबू आपले बाबासाहेब शिकले ना म्हणून तू बी शिक

ढोर चारायला बापाने पाठवलेल्या पोराला त्याची माय थांबवते, कुठ चालला बैला संग ? माय अव  बापू न सांगतल बैलाले घेऊन जाय चाराले म्हणून माय म्हणते बाबू तुयी शाळा रे तीथ कोण जाइन? शाळेत जा तू पोरग विचारतो आईला माय बापू म्हणते बैल चाराले जा तू म्हणत शाळेत जा का होणार आहे शाळेत जाऊन?

त्यावर ती खेड्यातली माय म्हणते बाबू काय होइन माहीत नाही पण आपले बाबा साहेब शिकले ना म्हणून तू बी शिक मोठा हो 

हे अनुभवाचे बोल आहे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय  मंत्री श्री राजकुमार बड़ोले यांचे.. शिकुन इंजीनियर, सरकारी अधिकारी आणि मंत्री झालेला तोच हां पोरगा ज्याला आईने शाळेत पाठविले केवळ याच विश्वास व श्रद्धे पोटी बाबासाहेब शिकले म्हणून तू बी शिक आणि तो ही शिकला मोठा झाला, घडला याच एका विचाराने

एकच देव एकच प्रेरणा बाबासाहेब या महामानवाने आपले जीवनच एक प्रेरणा म्हणून सकल समाजा समोर ठेवले आहे. किती तरी तरुणांचे आयुष्य या प्रेरणेतून विकसित झालेले आहे..

सतत प्रेरणादायी महामानव बाबासाहेब आंबेडकर चरणी अभिवादन

अशी भावनिक पोस्ट माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शेयर केली आहे. 





  Print






News - Gondia




Related Photos