महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१४ एप्रिल महत्वाच्या घटना

१६६१ : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

१६६५ : सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

१७३६ : चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

१९१२ : आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

१९४४ : मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

१९९५ : टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

१४ एप्रिल जन्म

१६२९ : डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १६९५)

१८९१ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)

१९१४ : अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१९१९ : पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)

१९१९ : भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)

१९२२ : मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

१९२७ : विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.

१९४२ : केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.

१९४३ : वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.

१४ एप्रिल मृत्यू

१९५० : भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

१९६२ : भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)

१९६३ : इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९३)

१९९७ : चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.

२०१३ : उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९३०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos