महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१३ एप्रिल महत्वाच्या घटना

१६९९ : गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१ : छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९ : हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९ : जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१९४२ : व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९६० : अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

१९९७ : मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

१३ एप्रिल जन्म

१७४३ : अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८९५ : भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)

१९०५ : इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

१९०६ : आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

१९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)

१९४० : राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

१९५६ : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

१९६३ : रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

१३ एप्रिल मृत्यू

१९५१ : औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

१९७३ : अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)

१९७३ : भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

१९८८ : महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

१९९९ : कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

२००० : चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

२००८ : संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)





  Print






News - todayspecialdays




Related Photos