महत्वाच्या बातम्या

 संकल्पनांचा देवदूत : लक्ष्मीकांत खाबिया या काव्यग्रंथाचे विमोचन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : ख्यातनाम लेखक, चित्रपट निर्माते संदीप राक्षे यांनी संपादित केलेला, संकल्पनांचा देवदूत हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याची आणि जीवन विषयक माहिती उपलब्ध करून देण्यात आली, काव्य स्पर्धेसाठी विषय दिला होता, संकल्पनांचा देवदूत, समर्पक अशा मथळ्याखाली ही काव्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार याच प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी त्या स्पर्धेसाठी, लक्ष्मीकांत दादा यांची सविस्तर माहिती दिली, त्यात त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आहे, अशी पीडीएफ फाईल दिली आणि विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेसाठी विविध प्रकारच्या रचना आल्या, कुणी मुक्तछंद तर कुणी अष्टाक्षरी तर कुणी अभंग रचना असे विविध प्रकार..... 

स्पर्धेच्या निमित्ताने एका चांगल्या कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वाची ओळख झाली, इतक्या सगळ्या रचनांच संकलन संदीपजींनी केले आणि त्यांचे हे सुंदर पुस्तक तयार झाले जितक्या कविता आल्या तितक्या सगळ्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या ..

पुस्तकाचे मुखपृष्ठ खूपच बोलके आणि साजेसा आहे, लक्ष्मीकांत दादांच्या मागे , आदरणीय शरद पवार साहेब दिसतात, साहेब ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या आयुष्यातील सगळी कामं यशस्वी होतात आणि त्यांचे मार्गदर्शन असलेल्यांना काही कमी पण पडत नाही ; असे वाटते की साहेब म्हणत, आहेत, पुढे च चालत रहा, खूप काही मार्गदर्शक असे मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे .

संदीप राक्षे यांनी मनोगतात कर्माच्या सिंध्दाताशी कर्तव्याचे पालन करणाऱ्या आणि विविध प्रकारचे कार्य करणाऱ्या लक्ष्मीकांत दादा यांच्याविषयी आणि त्यांनी केलेल्या समाजविधायक कार्याची माहिती दिली आहे.

या सगळ्याचा उद्देश अगदी स्वच्छ, तो म्हणजे या पुढील काळात समाजकार्य करणाऱ्यांना योग्य दिशा देण्याचे काम हा काव्यसंग्रह निश्चित करेल. लोक याला वेडेपणा ही म्हणतील पण वेडेपणाशिवाय इतिहास घडत नाही, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे आणि सत्य हे प्रभावी असते ते चमकते आणि इतरांना ही प्रकाशाकडे नेते.

या काव्यसंग्रहात खूप खूप छान रचना आहेत, पुरुषोत्तम, तेजोनिधी, उगवता तारासमाजसेवेचा इंद्रधनू, निष्काम कर्मयोगी, देवमाणूस, कल्पनांचा आविष्कार, मदतीचा महामेरू, आपला माणूस, आधारवड, दीपस्तंभ अशा एका पेक्षा एक सरस रचनांमधून लक्ष्मीकांत दादांच्या कार्याची महती वर्णिली आहे. अशा संकल्पनांचा देवदूत काव्य ग्रंथाचे विमोचन सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा श्रीवल्ली फेम युवा गायक जावेद अली, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, धारिवाल इंडस्ट्रिजचे एम. डी. प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रविण मसालेवाले उद्योगाचे एम. डी. विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राकेश सांकला, प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. काव्यग्रंथाचे वरील शब्दांकन कवयित्री वंदना इन्नाणी यांनी केले आहे..





  Print






News - Rajy




Related Photos