गडचिरोली जिल्हयात ७ जानेवारी पर्यंत ३७ (१)(३) कलम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयात कायदा व सुव्यस्था  आबाधित राखण्याच्या  दृष्टीने मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असते. गडचिरोली जिल्हयात  ३१  डिसेंबर  रोजी   जिल्हयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा नववर्षारंभ उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.   जिल्हयात  विविध राजकीय पक्षातर्फे त्यांचे मागण्या पुर्ण करण्याच्या दृष्टिने  धरणे, मोर्चे, आंदोलन, उपोषण करण्यात येत असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याच्या दृष्टीने संपुर्ण  गडचिरोली जिल्हयात  २४ डिसेंबर   ते ७  जानेवारी २०१९ पर्यंत  कलम ३७ (१) (३) लागु  करण्यात आले आहे. 

सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे.  या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी  इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे,  कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमाकरणे, तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. पोलिस विभागाच्या पुर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त  इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर  २४ डिसेंबर  ते ७ जानेवारी २०१९ पर्यंत  च्या २४ वाजेपर्यंत कोणीही जमा होणार नाहीत. हे कलम गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-27


Related Photos