महत्वाच्या बातम्या

 ७५ वर्षीय वृद्धाची हत्या : पोंभुर्णा तालुक्यातील घटना


- बैल तनिश खाल्यामुळे झाला वाद, वादातून केला प्राणघातक हल्ला 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित गावातील ७५ वर्षीय वृद्धांची हत्या झाल्याची घटना ४ एप्रिल ला घडली. या प्रकरणात पोलिसांनी महिलेसह ६ आरोपींना अटक केली.

७५ वर्षीय किसन लिंगाजी कुमरे यांच्या गोवडी मधील चारा दुसऱ्याच्या बैलाने खाल्या म्हणून सदर वाद सुरू झाला, वादाचे रूपांतर हत्येत झाले.

मृतक व आरोपी यांच्यात जुना कौटुंबिक वाद होता. पण बैलाने तनिश खाल्यामुळे आणखी विकोपाला जाऊन हत्यकांड घडले. गेलकिवार कुटुंबांनी किसन कुमरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यात किसन कुमरे यांचे घटनास्थळीच मृत्यू झाले.

कुमरे यांच्या हत्येनंतर बोर्डा दीक्षित गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांसहित दंगा नियंत्रक पथकाला गावात पाचारण करण्यात आले होते. कुमरे कुटुंबीयांनी किसन यांचा मृतदेह आरोपींच्या घरी नेऊन ठेवला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका कुमरे कुटुंब सहित गावातील नागरिकांनी घेतली.

पोलिसांनी तणावाला नियंत्रित करीत आरोपी केशव गेलकिवार, दामोदर गेलकिवार, अक्षय गेलकिवार, शुभम गेलकिवार, तुळशीदास गेलकिवार व कल्पना गेलकिवार यांना अटक केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos