महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भूमिपूजन 


- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश : १२ कोटी ३६ लक्षांचा निधी मंजूर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / चंद्रपूर : त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील महत्वाचा दुवा पंचायत समिती आहे. याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी येत असतात. त्यामुळे ही इमारत प्रशस्त असावी म्हणून आपण ही इमारत मंजूर केली आहे. आज या उभारू घातलेल्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात अत्यंत आनंद होत असुन सिंदेवाही शहरात विविध शासकीय विभागाच्या प्रशस्त इमारती तयार झाल्या असून या इमारती शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत असे प्रतिपादन यावेळी राज्याचे विरोधीपक्षनेता तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

सिंदेवाही येथे १२.३६ कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या भुमीपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस चे जेष्ठ चंद्रशेखर चन्ने, बाबुराव गेडाम, हरि बारेकर,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, तालुका उपाध्यक्ष संजय गाहाने, महीला आघाडी अध्यक्ष सिमा सहारे, माजी प.स. सदस्य राहुल पोरेडीवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उप नगराध्यक्ष मयूर सूचक, शहर महील आघाडी अध्यक्ष प्रीती सागरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजित मुप्पिडवार, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष राहूल बोडने, शहर काँग्रेस नवरगाव अध्यक्ष सुशांत बोडने, सेवा सहकारी संस्था गुंजेवाही अध्यक्ष संजय पुपरेड्डीवार, तथा सिंदेवाही नगर पंचायतीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तथा बहुसंख्य नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिंदेवाही तहसील कार्यालयाची इमारत जेवढी देखणी तयार केली आहे. अगदी तशीच इमारत पंचायत समितीची देखील असणार आहे. सिंदेवाही शहरातील विविध चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरू होत आहे. मागील दहा वर्षांपासून आपण मोठ्या प्रमाणात विकासकामा़ंसाठी निधी खेचून आणला आहे. शहरात सिंदेवाही- पाथरी मार्गावरील रेल्वे फाटकावर उडान पुल, चंद्रपूर मार्गावर नविन उंच पुल, शहरातील प्रमुख मार्गाचे काँक्रीटीकरण, उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, क्रीडा संकुल, ई लायब्ररी, व विश्रामगृहाची इमारत, नगरपंचायतीची इमारत ह्या सर्व इमारती आम्ही विशेष प्रयत्न करून मंजूर केल्या. तसेच आगामी नागरिकांच्या मूलभूत सुविधेचा परिपूर्ण विचार करून काळात संपुर्ण संपूर्ण तालुक्याचा विकास साधणार असेही ते यावेळी म्हणाले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos