गोगांव येथे विषारी चारा खाल्ल्याने पाच जनावरांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतातील विषारी चारा खाल्ल्याने पाच जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोगांव येथे आज १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये सुनील फुलझेले यांचा १ गोरा, शेखर भरडकर यांच्या २ गायी, कालिदास खेवले यांची १ गाय व अन्य १ गोरा  अशी पाच जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे जनावर मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार गोगांव येथील काही जनावरे काल शेतात चरावयास गेली होती. मात्र शेतमालकाने पिकावर रासायनिक औषधी फवारली असल्याने जनावरांनी औषधीयुक्त चारा खाल्ला. त्यामुळे या जनावरांना विषबाधा होवून ही पाचही जनावरे रात्रीच्या सुमारास मृत्यूमुखी पडली. काही जनावरे मालकाच्या घरी येवून तर काही जनावरे गावाशेजारी मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले. 
सकाळपर्यंत जनावरे घरी न आल्याने जनावर मालकांनी शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली. यामुळे जनावर मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-16


Related Photos