कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची ३२ पथके जाणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील वीज यंत्रणा पुरती कोलमडली असून वीज पुरवठा ठप्प आहे. बंद असलेला हा वीज पुरवठा पुराचे पाणी ओसरताच तत्काळ पूर्ववत करण्यासाठी महावितरणने जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार राज्यभरातून वीज अधिकारी- कर्मचाऱ्यांची ३२ अतिरिक्त पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर-सांगली जिह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. ट्रान्सफॉर्मर, विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि सांगली परिसरातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. सध्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने विद्युत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुणे, बारामती, सातारा विभागातून कोल्हापूरसाठी २४ तर सांगलीसाठी ८ पथके पाठवण्याचे निर्देश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. एका पथकामध्ये एक अभियंता, तीन विद्युत कर्मचारी आणि आठ इतर कर्मचारी असणार आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-10


Related Photos