महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवून अफ्रिकेतील घाना विद्यापीठातून हटविला पुतळा


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   अफ्रिकेतील घाना विद्यापीठात  असलेला महात्मा गांधी याचा पुतळा रातोरात हटविण्यात आला आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता.
 गांधींजींना रेसिस्ट अशी उपाधी देऊन घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली.  तसेच त्यासाठी आंदोलनही सुरु झाले. त्यानंतर विद्यापीठाने हा पुतळा हटवला.
अफ्रिकेतील देश घाना या ठिकाणी असलेल्या अक्रा या राजधानीच्या शहरातील विद्यापीठामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसेच पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आली ज्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून पुतळा हटवण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी दोन वर्षांपासून विद्यार्थी आणि प्राध्यपकांची आंदोलने होत होती. अखेर हा पुतळा हटवण्यात आला आहे.
महात्मा गांधींचे अफ्रिकेतील समुदायांबद्दलचे विचार हे अफ्रिका खंडाचा अपमान करणारे होते त्यामुळे त्यांची प्रतिमा कुठेही लावली जाऊ नये असे आंदोलकांनी म्हटले होते. त्याचमुळे या ठिकाणी असलेला पुतळा हटवण्यात यावा. जगभरात महात्मा गांधींना अहिंचेसे प्रतीक मानले गेले आहेत. महात्मा गांधीचे अनुयायी जगभरात आहे. अशात अफ्रिकेतील घाना या देशाने मात्र गांधीजींना वर्णभेदी ठरवले आहे. हा पुतळा भारत सरकारतर्फे बसवण्यात आला होता. २०१६ मध्ये या पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले होते. मात्र या पुतळ्यावरून सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे हा पुतळा आता हटवण्यात आला आहे. द वायरने या संदर्भातले वृत्त दिले आहे.   Print


News - World | Posted : 2018-12-15


Related Photos