महत्वाच्या बातम्या

 पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त अभियानाकरिता १५ एप्रिलपर्यंत नागरिकांना तक्रार अर्जाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येत आहे. यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही रस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत, पाणंद रस्ते तयार करण्याकरीता मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर नागपूर जिल्ह्यात शेत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त अभियान २०२३-२४ राबविण्यात येत आहे.

 पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त अभियानात अतिक्रमित शेत रस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष असतील. तर कार्यकारी अभियंता (बांधकाम) जिल्हा परिषद सदस्य सचिव असतील. जिल्हाबरोबरच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून गट विकास अधिकारी हे सहअध्यक्ष असतील. अर्जदारांनी संबंधित तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावयाचा आहे.

पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त अभियान नागपूर २०२३-२४ हे यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम नागपूर जिल्ह्यासाठी राबविण्यात येणार आहे. नागरिकांचे तक्रार अर्ज १६ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जावर तपासणी व चौकशी १६ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे. चौकशी अंती करावयाची कार्यवाही व आदेश १६ मार्च ते १५ मे पर्यंत करण्यात येणार आहे. प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास २० मे पर्यंत कळविण्यात येणार आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos