हटिया येथील राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सादर केली महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निर्देशालय, पटना, बिहार यांच्या संयुक्त विद्यमाने नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्री एण्ड फोर्ज टेक्नॉलॉजी हटिया, रांची, झारखंड येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर  या कालावधीत पार पडले.  या शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने  महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती सादर केली . 
  शिबिरात संपूर्ण भारतातून राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा राज्यातील २१० स्वयंसेवक सहभागी झालेले होते.  सदर शिबिरामध्ये  महाराष्ट्र राज्याच्या रासेयो संघाचे संघनायक ,  श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा चे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास डी. बल्की यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित विविध महाविद्यालयातील आठ विद्यार्थी या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ म्हणून सहभागी झाले होते. सदर शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविधता सादर केली. त्यामध्ये कोळीनृत्य,लावणी, गणपती विसर्जन, शेतकरी आत्महत्येवर आधारित लघुनाट्य आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरीची वारी सादर केली. पंढरीच्या वारीमध्ये संघनायक प्रा. गुरुदास बल्की यांनी सुद्धा स्वयंसेवकांसोबत सहभाग घेतला.  महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील विविधांगी कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम  सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केलं. महाराष्ट्राच्या संघात सुरज देशकर चिमूर, अभिषेक शर्मा चंद्रपूर, गुलाब राऊत नागभीड, रमेश रॉय गडचांदूर, कु. पल्लवी वऱ्हाटे राजुरा, कु. रेश्मा राखडे ब्रम्हपुरी, धनश्री कावरे भिशी, कु. राजनोती कोरेटी कोरची  यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.  सदर शिबीर रासेयो क्षेत्रीय निर्देशालाय पाटणा, बिहार  चे प्रादेशिक संचालक  डॉ.  विनय कुमार  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर सर तसेच रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिरात स्वयंसेवकांनी भाग घेतला. 



  Print






News - Rajy | Posted : 2018-12-13






Related Photos