सीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
सीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामना सुरु होता त्यावेळेस प्रेक्षक गॅलरी चा लोखंडी कठडा खाली कोसळला.  अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला स्पर्धेच्या ठिकाणी पळापळी सुरु झाली. या घटनेत १००  च्या वर नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  उपस्थित नागरिकांनी त्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले . जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन न करणे हे आयोजकांना चांगलेच भोवले अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-11


Related Photos