महत्वाच्या बातम्या

 भामटा राजपूत समाजाचे अर्ज स्वीकारण्यास अटकाव होणार नाही : विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बुलढाणा : संपूर्ण राज्यामध्ये भामटा राजपूत समाजास कास्ट व्हॅलेडीटी  संदर्भातील अर्ज स्वीकारण्यात अटकाव होत आहे. जिल्हयातील शेकडों विद्यार्थी जात पडताळणी मिळत नसल्याने त्रस्त झाले आहे. या संदर्भात भामटा राजपूत समाजाच्यावतीने आ. संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार केली असता. आ. संजय गायकवाड यांनी संबंधित विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्याशी चर्चा करुन यापुढे अर्ज स्विकारण्यात अटकाव करण्यात येवू नये अशी सूचना दिली. त्‍यावर उपायुक्त यांनी देखील सकारात्‍मक आश्वासन देत जात पडताळणी प्रमाणपत्र कमीत कमी कालावधीत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. ही चर्चा आ. संजय गायकवाड यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय येथे सोमवारी दुपारी पार पडली.
बुलढाणा व मोताळा तालुक्यात मोठया प्रमाणात भामटा राजपूत समाज राहतो. या समाजास जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने शेकडों विद्यार्थी अडचणीत आहेत. अनेकांच्या शैक्षणिक जीवनावर संकट उभे राहीले आहे. या संदर्भात मोताळा तालुक्यातील नागरिकांनी आमदार संजय गायकवाड यांची भेट घेवून आपल्या अडचणी त्‍यांच्या समोर मांडले. तसेच नीट, जेईई व सीईट परीक्षा देणा-या विद्यार्थांचे भवितव्य अडचणीत असल्याची माहिती दिली. त्‍यावर आमदार संजय गायकवाड यांनी उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या सोबत चर्चा करून या समाजाच्या अडअडचणी त्‍यांच्या समोर मांडले.
या विषयावर तब्बल एक तास चर्चा केले. यावेळी उपायुक्त वानखेडे यांनी आपल्याकडे अनेक त्रुटी असलेल्या अर्ज येतात त्यामुळे त्या वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याने सदर अर्ज नाकारले जात असल्याची माहिती दिले. त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी त्रुटी असलेले अर्ज सुद्धा स्वीकारावे तसेच अर्जास कोणत्याही प्रकारचा अटकाव करण्यात येऊ नये, त्यांची पडताळणी झाल्याच्या नंतर सदर अर्जदारास त्याची माहिती द्यावी व लवकरात लवकर तो अर्ज निकाली काढावा अशी मागणी केले. तसेच शिक्षण घेणाऱ्या भामटा राजपूत समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना दिले.
त्‍यावर उपायुक्त वानखेडे यांनी यापुढे जिल्हयातीलच नव्हे तर जिल्हयाबाहेरील अर्जास देखील कोणत्याही प्रकारच्या अटकाव केला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे भामटा राजपूत समाजात आनंदाचे वातावरण आहे.





  Print






News - Rajy




Related Photos