गडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दुचाकीने रस्ता ओलाडतांना ट्रॅक्टर नजरेस न आल्याने दुचाकी व ट्रॅक्टरच्या झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर  घटना आज  ८ डिसेंबर रोजी दुपारी २.२५ वाजेच्या सुमारास खरपुंडी नाक्याजवळ घडली. मोतिराम मेश्राम (६८ ) रा. कापसी ता. सावली जि. चंद्रपूर  असे असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मृतक मोतिराम मेश्राम हे एमएच ३५ बीई ३४२७ या क्रमाकाच्या दुचाकीने गडचिरोली शहरातून खरपुंडीकडे जात होता. तर आरमोरीकडून गडचिरोली शहराकडे एमएच ३४ एफ १९१४ या क्रमाकाची ट्रॅक्टर येत होती. दरम्यान, एक ट्रक समोरून गेल्यानंतर त्या ट्रकच्या मागून येणारी ट्रॅक्टर मृतक दुचाकीस्वाराच्या नजरेस न पडल्याने दुचाकी व ट्रॅक्टरचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार मोतिराम मेश्राम हे जागीच ठार झाले. गडचिरोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-08


Related Photos