महाराष्ट्राला केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत १.४७ लाख कोटी रुपयांचा निधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांमार्फत १.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत उत्तर प्रदेश आणि दिल्लीनंतर महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे.
२०२०–२०२१ मध्ये एकूण ३.८६ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले. हा आकडा २०२३-२०२४ मध्ये ४.१९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, पण २०२४-२०२५ मध्ये तो ३.६३ लाख कोटी रुपयांपर्यंत घटला आहे.
महाराष्ट्राला मिळालेला निधी (कोटींमध्ये) -
आर्थिक वर्ष निधी (कोटींमध्ये)
२०२०–२१ ४७,६०६
२०२१–२२ १६,७८५
२०२२–२३ २४,४४३
२०२३–२४ ३०,२९३
२०२४–२५ २७,९६८
केंद्र पुरस्कृत योजनांमधून निधी वितरण हे संबंधित योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालन, राज्यांच्या मागणी, यापूर्वी दिलेल्या निधीच्या वापराची पूर्तता आणि राज्याच्या हिश्श्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. महाराष्ट्रातील केंद्राच्या सहकार्याने विविध विकासकामे राबवली गेली आहेत, यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
News - World




Petrol Price




