१८ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी जुन्या आठवणींना दिला उजाळा


- नवरगाव येथील लोकसेवा व श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेंकासोबत साधला हितगुज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते.
मात्र १८ वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतर प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालय व श्री ज्ञानेश महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यीनींनी दाखवून दिले आणि तब्बल १८ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यीनींनीचा कौटुंबिक सोहळा आयोजित करण्यात आला.
नवरगाव येथील लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालय व श्री ज्ञानेश महाविद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी एक दोन नव्हे तर चक्क १८ वर्षांनी पुन्हा एकत्र आले. काही माजी विद्यार्थींनीनी पुढाकार घेत आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटण्याचे नियोजन केले. त्यानुसार नुकताच फिस्कुटी येथील श्री समर्थ ऍग्रो टुरिझम येथे माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा येथे अभुतपूर्व उत्साहात पार पडला.
या विद्यालयातून हे विद्यार्थी केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत, यातील काही समाजसेविका, उद्योजिका, शिक्षिका, नोकरी तसेच विविध क्षेत्रात आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी आदर्श गृहिणी आहेत. ज्यांचा ऋणानुबंध आजही या शाळेशी जोडलेला आहे. अनेक माजी विद्यार्थिनी यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रत्येकांना फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुषमा धानोरकर, रुपाली आदे, अस्मिता बन्सोड, भाग्यश्री बोरकर, योगिता मटाले, पूनम अगडे, अर्चना खोब्रागडे, शमीम शेख, पल्लवी चौधरी, मर्जीना पिल्लेवान, किशोरी रंदये, जोस्त्ना आदे उपस्थित होत्या.
News - Chandrapur




Petrol Price




