महत्वाच्या बातम्या

 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे समाजशास्त्र विभागाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.

महिलांच्या स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने Skin Care And Advanced Make-Up या विषयावर एक दिवसीय आंतर महाविद्यालयीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रेणुका दुधे, सौ. कांता ढोके तसेच कार्यशाळेच्या मार्गदर्शिका सौ.मीनाक्षी कुमार, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. कल्याणी पटवर्धन प्रा. सौ. सविता पवार, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा मंचावर उपस्थित होत्या.

कार्यशाळेच्या मार्गदर्शिका सौ. मीनाक्षी कुमार यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या व्यवसायातून कशाप्रकारे व्यवसाय करून महिला सक्षमीकरण होऊ शकते. त्याचप्रमाणे या व्यवसायात स्त्रियांसाठी कोण कोणत्या संधी उपलब्ध आहेत. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी समाजशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. सौ कल्याणी पटवर्धन, प्रा. सौ सविता पवार यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. सौ शुभांगी भेंडे शर्मा यांनी स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून आंतर महाविद्यालयीन कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थिनींसाठी केले. या कार्यशाळेला जवळपास साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संचालक संजय कायरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. डॉ.बालमुकुंद कायरकर, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. डॉ. पंकज कावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले. त्याचप्रमाणे प्रितेश बोरकर ओम कोराम, स्नेहा गोर, सायली वानखेडे , योगेश हांडे, अश्विनी खोब्रागडे, नेहा मिस्त्री, अनम या विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यक्रमाच्य यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos