महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर येथे ११ मार्चला राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र पक्षिमीत्र संयोजीत, इको - प्रो संस्था द्वारे 35 वे पक्षिमीत्र संमेलनाचे आयोजन चंद्रपूर शहरात येत्या 11 व 12 मार्च रोजी वन अकादमी परिसरातील केले आहे. या संमेलनाचे उदघाटन राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील पक्षी अभ्यासक, तज्ञ एकत्रीत येणार आहेत. पक्षिमित्रांचा अभ्यास, संशोधन यावर सादरिकरण, व्याख्याने होणार असून या शिवाय पक्षिनिरीक्षणांचा कार्यक्रम आहे.

सदर संमेलनाचे आयोजन जिल्हयातील पर्यावरण क्षेत्रातील कार्यरत इको-प्रो संस्थेने केले असुन, सह आयोजक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर वनविभाग आहे. सदर संमेलन जिल्हयातील वरोरा तालुक्यात अस्तित्व असलेले संकटग्रस्त अशा माळढोक पक्ष्याचे भविष्यतिल संवर्धन तसेच जुनोना परिसरातुन शेवटचा सारस पक्षी सुध्दा संपुष्टात आल्याने येथील सारस अधिवास संवर्धन या संमेलनाच्या चर्चेचा मुख्य विषय असणार आहे. याकरीता माळढोक व सारस पक्षी यावर अभ्यास असणारे तज्ञ, मार्गदर्शक यांचे सादरीकरण व अभ्यास मांडण्यात येणार आहे. सोबतच राज्यातील पाणस्थळ, माळरानातील पक्षी, विविध जलाशयावर येणारी स्थंलातरीत पक्षी, वन्यपक्षी आदी पक्षी व पक्षी अधिवास संरक्षण व संवर्धनाविषयी महत्वपुर्ण मांडणी पक्षीमित्र करणार आहे.

३५वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष राजकमल जोब हे आहेत. उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सहा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच पक्षी विषयक पुस्तके प्रकाशित होणार आहेत. शिवाय, पर्यावरण अभ्यासक किशोर रिठे यांची प्रगट मुलाखत होईल, ही मुलाकात पर्यावरण कार्यकर्ते स्वानंद सोनी घेणार आहे.

सदर पक्षिमीत्र संमेलनादरम्यान माळढोक पक्षी यावर वाईल्डलाईफ इस्टीटयुट ऑफ इंडीयाचे डॉ. सुतीर्था दत्ता, अहमदनगरहुन डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. अनिल माळी, डॉ अनिल पिंपळापुरे यादी मान्यवर चर्चासत्रात सहभागी होतील. सोबतच सारस पक्षी यावरभंडारा-गोंदिया चे मुंकुंद धुर्वे, सावन बाहेकर व रवी पाठेकर चर्चासत्रात सहभागी होतील. याशिवाय पक्षी छाायाचित्रण संरक्षण व जनजागृती, वन्यपक्षी, पाणस्थळ, रामसार स्थळ, माळरानातील पक्षी यावर सुध्दा सादरीकरण व चर्चासत्र होणार आहे.

यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात येणार असुन ही प्रदर्शनी अनेक पक्षी व पक्षी अधिवासाची छायाचित्रे प्रदर्शीत केले जाणार आहे. यासोबतच पक्षी छायाचित्र स्पर्धा सुध्दा आयोजीत करण्यात आलेली असुन राज्य व राज्याबाहेरून सहभाग घेतलेल्या स्पर्धकांची पक्षी छायाचित्रे सुध्दा या प्रदर्शनात बघायला मिळतील. सदर संमेलनात राज्यभरातुन येणारे जवळपास तिनशे पक्षिमित्र निवासी असणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos