महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवकाकरिता अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, स्वच्छता अभियान, आरोग्य जागृती, साक्षरता, लिंग, भेद, सामाजिक समस्यांचे निराकरण, आपतकालीन  परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक युवकांनी 9 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विविध गावात स्वयंसेवक म्हणुन चैनल पध्दतीने युवा मंडळाच्या माध्यमातून तालुका स्तरावर कार्यक्रम राबविण्याकरीता नेहरु युवा केंद्राच्यावतीने राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक स्वयंसेवकांचे वय 18 वर्षावर व 29 वर्षापेक्षा कमी असावे. शिक्षण कमीतकमी 10 वी असावे. पदवीधर व समाजकार्य पदवीधारकास प्राधान्य दिले जाणार आहे. स्वयंसेवकाकरीता नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पात्र असणार नाही. एकत्रित मासिक मानधन 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. ही नोकरी नसल्यामुळे कोणताही लाभ मिळणार नाही. कोणत्याही प्रकारच्या रोजगारांसाठी अधिकार राहणार नाही.  प्रत्येक तालुक्यासाठी 2 स्वयंसेवक राहील.

स्वयंसेवकाचा कालावधी एक वर्षाकरीता असून कामाचे स्वरुप लक्षात घेता पुढील वर्षाकरीता मुदतवाढ देण्यात येईल. इच्छुक पात्र युवकांनी नेहरु युवा  संगठणच्या https://nyks.nic.in/nycapp/main.asp या संकेतस्थळावर अधिक माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज करावे. उमेदवार जिल्ह्यातील रहिवासी असावा. उमेदवार ज्या तालुक्यातील आहे. त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, व्हीआयपी रोड, तिवारी ले आऊट, गोपूरी येथील कार्यालयाच्या 07152-295068 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नेहरु युवा केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos