महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना (१९ फेब्रुवारी)

१९ फेब्रुवारी १८७८ : थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.

१९ फेब्रुवारी १८८४ : यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

१९ फेब्रुवारी १९४२ : पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.

१९ फेब्रुवारी २००३ : तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

जन्म (१९ फेब्रुवारी)

१९ फेब्रुवारी १४७३ : सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)

१९ फेब्रुवारी १६३० : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

१९ फेब्रुवारी १८५९ : स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्‍हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)

१९ फेब्रुवारी १८९९ : गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.

१९ फेब्रुवारी १९०६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)

१९ फेब्रुवारी १९१९ : मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)

१९ फेब्रुवारी १९२२ : पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)

१९ फेब्रुवारी १९६२ : झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा जन्म.

मृत्यू (१९  फेब्रुवारी)

१९ फेब्रुवारी १८१८ : पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.

१९ फेब्रुवारी १९१५ : थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६)

१९ फेब्रुवारी १९५६ : प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.

१९ फेब्रुवारी १९५६ : ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)

१९ फेब्रुवारी १९७८ : गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: १० मे १९०५)

१९ फेब्रुवारी १९९७ : संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)

१९ फेब्रुवारी १९९७ : सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)

१९ फेब्रुवारी २००३ : पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos