दूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्यास होणार जन्मठेप, विधेयक सभागृहात मांडणार


- अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची घोषणा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
दूध व अन्नपदार्थांमध्ये   भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना यापुढं जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत केली. 
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बापट यांनी भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येईल, असं सांगितलं. याआधी हा गुन्हा अदखलपात्र होता. तसंच, गुन्ह्याची शिक्षा फक्त सहा महिन्यांपर्यंत होती. त्यामुळं कायद्याचा धाक नव्हता. मात्र, यापुढं हा गुन्हा दखलपात्र नसेल. या संदर्भातील कायदा आणखी कठोर केला जाईल. गुन्ह्याची तीव्रता पाहून सहा महिन्यांपासून ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईल, असंही बापट यांनी स्पष्ट केलं.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-22


Related Photos