महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१३ फेब्रुवारी)

१३ फेब्रुवारी १६३० : आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

१३ फेब्रुवारी १६६८ : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१३ फेब्रुवारी १७३९ : कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

१३ फेब्रुवारी १९६० : फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

१३ फेब्रुवारी १९८४ : युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

१३ फेब्रुवारी १९८८ : कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

१३ फेब्रुवारी २००३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

१३ फेब्रुवारी २०१० : पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.

जन्म (१३ फेब्रुवारी)

१३ फेब्रुवारी १७६६ : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

१३ फेब्रुवारी १८३५ : अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८)

१३ फेब्रुवारी १८७९ : प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)

१३ फेब्रुवारी १८९४ : इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)

१३ फेब्रुवारी १९१० : वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९९)

१३ फेब्रुवारी १९११ : लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)

१३ फेब्रुवारी १९४५ : अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

मृत्यू (१३ फेब्रुवारी)

१३ फेब्रुवारी १८८३ : जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)

१३ फेब्रुवारी १९०१ : गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)

१३ फेब्रुवारी १९६८ : संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

१३ फेब्रुवारी १९७४ : इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)

१३ फेब्रुवारी २००८ : हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.

१३ फेब्रुवारी २०१२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos