पत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा


वृत्तसंस्था /  लातूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून ती ठार झाल्यानंतर करवतीने  शरीर कापून रक्त पिणाऱ्या पतीने तिचा खून केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पतीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संजय पांडुरंग गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. 
शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या संजय पांडुरंग गायकवाड याने आपली पत्नी सागरबाई संजय गायकवाड हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन २०१५ साली तिचा खून केला होता व तिचे शरीर कापून रक्त ओंजळीत घेऊन त्याने प्यायले होते. या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी दिलेल्या निकालात आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा मुलगा अजय व भावजय बबिता या प्रत्यक्षदर्शीनी या प्रकरणी साक्ष दिली होती. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विठ्ठल देशपांडे यांनी हा खटला चालवून आरोपीस  फाशीची मागणी केली. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. वाघमोडे यांनी काम पाहिले.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-31


Related Photos