महत्वाच्या बातम्या

  महानिर्मिती, महापारेषणच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव : ग्राहकांवर प्रति युनिट सवा रुपयाचा भार पडणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महानिर्मिती आणि महापारेषणने बहुवार्षिक वीजदर निश्चिती अंतर्गत वीज आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानुसार राज्यातील वीज ग्राहकांच्या डोक्यावर प्रति युनिटमागे सुमारे १ रुपया ३५ पैशांचा भार पडणार असल्याचा असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. वीज कायद्यातील तरतुदींचा आधार घेत मागील चार वर्षांच्या वाढीव खर्चा बरोबरच २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या अपेक्षित वाढीव खर्चासाठी याचिका दाखल केल्या आहेत. त्यानुसार महानिर्मितीने मागील चार वर्षांतील जादा खर्च व येणाऱ्या दोन वर्षांतील अपेक्षित जादा खर्च यासाठी पूर्वी आयोगाने मंजूर केलेल्या रकमे व्यतिरिक्त एकूण २४ हजार ८३२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाढीची मागणी केलेली आहे. सदरची रक्कम दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास १.०३ रुपये प्रति युनिट याप्रमाणे होणार आहे. त्याच बरोबर महापारेषण कंपनीने मागील खर्चा बरोबरच पुढील दोन वर्षांच्या वाढीव खर्चापोटी ७ हजार ८१८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे ग्राहकांवर प्रति युनिटमागे ३२ पैशांचा भार पडणार असल्याचा आरोप ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. याशिवाय महावितरणने दिलेला प्रस्ताव अद्याप जाहीर झालेला नाही, पण त्यामुळे ग्राहकांवर मोठा भार पडेल असा अंदाज होगाडे यांनी व्यक्त केला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos