महत्वाच्या बातम्या

  गोंडवाना विद्यापीठात संशोधन प्रकल्प प्रस्ताव लेखन यावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातर्फे भविष्यातील संशोधकांना प्रबोधन करण्यासाठी संशोधन प्रकल्प प्रस्ताव लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आज दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आली. संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या शैक्षणिक कार्याला चालना देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा उपक्रम म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, प्रमुख वक्ते म्हणून सहयोगी प्राध्यापक, सेंटर फॉर इंग्लिश लँग्वेज एज्युकेशन, आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली कृष्णा के. दिक्षित होते. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश संपूर्ण शैक्षणिक बंधुभगिनींना आधुनिक संशोधन साधने आणि त्यांच्या उपयुक्ततेबद्दल जागरूक करणे हा होता तसेच सहभागींचे ज्ञान वाढविणे हा होता. संशोधन प्रकल्प प्रस्ताव लेखन कार्यक्रम विद्यापीठातर्फे आयोजित करणे ही सुरवात होती. पुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. अरुंधती निनावे यांच्या समन्वयाखाली हा कार्यक्रम पार पडला असून कार्यक्रमाचे संचालन  सहायक प्राध्यापिका, जनसंवाद विभाग,गौरी ठाकरे यांनी केले. संपूर्ण सहभागी आणि मान्यवरांच्या उदार प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. ही कार्यशाळा दूरदृष्य प्रणाली द्वारे घेण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos