महत्वाच्या बातम्या

 प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण


- क्षारोपणाकरीता संवर्धनाकरीता घातले साकडे

- गायत्री मंत्र आणि चांगभलंचा गजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आज सामाजिक न्याय भवन ते सेवाग्राम रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कडेला प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसरंक्षक पंच, तहसिलदार रमेश कोळपे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, मुख्याधिकारी राजेश भगत, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते, वर्धा विदर्भ साहित्य संघाचे वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे, तिगावकर, वैद्यकीय मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने आदी उपस्थित होते.

यावेळी सयाजी शिंदे यांनी सामाजिक न्याय भवन ते सेवाग्राम रोडच्या कडेल वृक्षरोपण करुन सर्व मान्यवरांसह गायत्री मंत्राचा जप करुन वृक्षरोपण केल्यावर त्या वृक्षाच्या नावाने हात जोडून परमेश्वराकडे साकडे घातले व चांगभलंचा गजर केला.





  Print






News - Wardha




Related Photos