यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह


वृत्तसंस्था / सांगली : शांतिनिकेतनमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थीनीचा मृतदेह आढळला आहे. वैशाली तानाजी नलवडे असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मुक्त विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत होती. 
प्राप्त माहितीनुसार आज मुक्त विद्यापीठाचे वर्ग असल्याने वैशाली कॉलेजला आली होती. मात्र पॉलिटेक्निक इमारतीच्या वर्गात वैशाली हिचा मृतदेह सापडला आहे. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. वैशाली ही मल्लेवाडी गावची आहे. 
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. वैशाली हिचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोस्ट मार्टमनंतर याबाबत खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-09


Related Photos