महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयातील सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रामध्ये स्वयंम योजनेचे अर्ज सुरू करण्यात आले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन विंग बी शासकीय औद्यैागिक प्रशिक्षण संस्थेसमोर दीक्षाभूमी रोड श्रध्दानंदपेठ नागपूर येथून अर्ज प्राप्त करीत अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos