महत्वाच्या बातम्या

 शाळा हे विज्ञान प्रयोग संशोधनाचे केंद्र असावे : प्राचार्य डॉ. विनित मत्ते


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आरमोरी : विज्ञान हा दैनंदिन जिवन जगण्याचा भाग असल्याने विविध प्रश्न व समस्याची सोडवणूक करण्यासाठी शाळा हे संशोधनाचे केंद्र असावे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते यांनी केले. 3 दिवस चालणान्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैरागड येथे 6 फेब्रुवारीला करण्यात आले होते. त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी अशोक कुशंकर होते.

मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मनोज काळबांडे, जिल्हा परिषद माजी सभापती विश्वास भोवते, वैरागड येथील संरपंच सौ. संगीता पैदाम, गोडवाना विद्यापिठाचे माजी अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, वैरागड येथील उपसरपंच भाष्कर बोडणे, जिल्हा परिषद सदस्य सौ. गुरनुले वैरागड येथील पोलिस पाटिल  भानारकर, आरमोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे, आरमोरी गट साधन केंद्राचे गट समन्वयक तथा कार्यक्रम व्यवस्थापक कैलास टेंभूर्णे, डायटचे विषय सहायक डॉ. विजय रामटेके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos