महत्वाच्या बातम्या

 प्रशासनाने घेतली दखल : टुटलेले रेलिंग दुरुस्ती कार्याला सुरुवात


- आष्टी -चामोर्शी महमार्गावरील प्रवास होईल सुखरूप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आष्टी : आष्टी-चामोर्शी महामार्गावरील उमरी नाल्याजवळील, कोनसरी, सोमनपल्ली जवळील वळणावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दूतर्फा लावण्यात आलेले दोन्ही बाजूच्या लोखंडी संरक्षण रेलिंग हळूहळू दररोज त्यांची स्थिती बिकट होत असल्याचे निदर्शनास येत होते. 

लोखंडी रेलिंग भंगार चोरटे हळू-हळु त्यांचे रैबिट नट-बोल्ट ढीले करुण रेलिंगला त्यांच्या मूळ स्थापसुन करत- करत ते पूर्णपणे मोकळे झाले की, रात्रों चोरून नेण्याचा प्रकार सुरु होता. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता

सदर प्रकाराची बातमी प्रसारीत होताच उर्वरित रेलिंग पूर्णपणे चोरी होण्या अगोदर प्रशासनाने तात्काळ दखल घेत दुरिस्ती कामाला सुरुवात करण्यात आली, त्यामुळे आता या महामार्गावर प्रवास सुखरूप होईल. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos