महत्वाच्या बातम्या

 नवनवीन शैक्षणिक माहिती घेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे : केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम 


- बोरी केंद्रात आठवी शिक्षण परिषदचे आयोजन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : समुह साधन केंद्र बोरी अंतर्गत केंद्रातील आठवी शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगाव येथे आयोजित करण्यात आली. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनुसया निखाडे यांनी केले. यावेळे केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम, फुलोरा समन्वयक निलेश कोडापे, जेष्ट शिक्षक प्रकाश दुर्गे, विषय शिक्षक तथा मार्गदर्शक शैला गोरेकर, राजेश गड्डम, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पुरुषोत्तम चापले यांची होती. बदल हा निसर्गाचा नियम आहे. नविन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये निपुन भारत अंतर्गत नवनवीन शैक्षणिक बाबीचा उहापोह करण्यात आला आहे. नवनवीन शैक्षणिक संकल्पना पुढे येत आहेत. म्हणून शिक्षकांनी सर्व आवश्यक माहितीचे संकलन करून संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करून विद्यार्थ्यीना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण द्यावे असे मार्गदर्शन केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम यानी केले. या प्रसंगी शिक्षक निलेश कोडापे, शैला गोरेकर, प्रकाश दुर्गे यांनी नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षकाची भुमीका या विषयावर मार्गदर्शन केले. 

शिक्षण परिषदेत फुलोरा डॅश बोर्ड व अँप या बाबतीतही मिहीती तसेच निपुन भारत अंतर्गत माता पालक गट व माता पालकाची भुमीका , फुलोराचे भाषा व गणित विषयाचे आदर्श नमुना पाठ सादरीकरण, 2020 शाळा भेटीचे स्वरुप व मूल्यमापन पद्धती, निपुन भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन डाॅ.आत्माराम तोंडे, ममता वरखडे, निलेश कोडापे, शैला गोरेकर व केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार अनिष बंडावार यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी जामगाव शाळेचे मुख्याध्यापक तिरुपती मंत्रीवार ,भय्या वाघमारे व शाळा व्यवस्थापन समातीचे सहकार्य मिळाले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos