चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात २५ वर्षीय कैद्याची गळफास लावून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या उमेश दामाजी नैताम (२५) या कैद्याने आज बुधवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सदर आत्महत्या करणारा कैदी मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील साखरटोला या गावचा रहिवासी असून हा हत्या प्रकरणात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आज बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास बॅरेक क्रमांक सहाच्या स्वच्छतागृहाचे मागे त्याने दुपट्टाच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे सुरक्षेत तैनात शिपायाला निदर्शनास आले. लागलीच त्याला खाली उतरवून वैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासनीनंतर कैद्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याची माहिती तुरूंग अधिकारी आत्राम यांनी दिली. 
  Print


News - Chandrapur | Posted : 2021-07-21


Related Photos