महत्वाच्या बातम्या

 हीरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा महोत्सव 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा : स्थानिक हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरोर येथे सत्र २०२२-२०२३ च्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन वरोरा भद्रावती विधानसभा मतदार शेत्राच्या आमदार सौ. प्रतिभा  धानोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्यधापक तथा प्राचार्य रविंकांत जोशी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य कु. विमल बोरा, कृष्णकांत लोया, कमलकर्जी पावडे उपस्थित होते. या सोबतच मंचावर विद्यालयाचे प्रवेशक परशराम पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रजु चिकरे यांची उपस्थिती होती. आपल्या उदघाटन भाषणात आमदार सौ. प्रतिभा यांनी विद्यार्थी जीवनात खेळांचे महत्व विशद केले. तसेच अशा प्रकारच्या आयोजन भव्य सौरुपात केल्याबद्दल  हिरालाल लोया विद्यालयाचे कौतुक केले. या प्रसंगी त्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली तसेच धनुर्विद्या या खेळाचा वापर करून कार्यक्रमाचे उदघाटन बान मारून अचूक नेम साधला. कार्यक्रमाचे संचालन सौ. पोटे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. कथलकर यांनी केले. या क्रीडा महोत्सवाला वर्ग ५ ते १२ चे जवळपास २५०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे सर्व  शिक्षक राजू चिकटे, महेश डोंगरे, संजय बोंडे, संध्या धांडे, बंडू कळसकर अध्यापक तथा अड्यापिक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.





  Print






News - Chandrapur




Related Photos