महत्वाच्या बातम्या

  महिला शहर काँग्रेस सिंदेवाहीतर्फे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न


- मकरसंक्रांत निमित्य हजारो महिलांची उपस्थिती वाणाचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : २७ जानेवारीला सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी-कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याच्या युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, अध्यक्ष म्हणून किरण विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा आशा गंडाटे, डॉ. रचना भालतडक, डॉ. पदमजा वरभे, सिंदेवाही महीला काँग्रेस तालुका अध्यक्ष सिमा सहारे, ॲड. मोहुर्ले, गोंडपिपरी महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा रामटेके, सरचिटणीस नंदा नरसाळे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

या प्रसंगी उपस्थित त्यांना मार्गदर्शनात किरण वडेट्टीवार यांनी सांगितले की, आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी ही त्यांच्या आत्मविश्वासाची पावती असुन आजचे महिला चूल आणि मुल या पारिवारिक जबाबदारीच्या पलीकडे अवकाशात झेप घेत पुरुषांची बरोबरी साधत आहे. तर युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी जो इतिहास रचला अगदी त्याच धाडसाने प्रेरणा घेऊन स्त्री अत्याचार विरोधात एकजुटीने लढून महिला सशक्तीकरण व महिलांचा सर्वांगीण विकास यावर प्रकाश टाकला. यानंतर मंचावरील अनेक मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी सिंदेवाही शहर व परिसरातील उपस्थित हजारो महिलांना मकर संक्रांत निमित्ताने वाणाचे वितरण करण्यात आले. तर उपस्थित चिमुकली व महिलांनी आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री नागापुरे (कावळे), प्रास्तविक महीला काँग्रेस शहर अध्यक्ष प्रिती सागरे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पूजा रामटेके, रूपाली रत्नावार, अंजू भैसारे, नीता रणदिवे, अस्मिता जुमनाके, मीनाक्षी मेश्राम, श्वेता मोहूर्ले, पुष्पा सीडाम, संगीता शंकपाळ यांनी अथक परिश्रम घेतले. हळदी कुंकू कार्यक्रमातील महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरले.





  Print






News - Chandrapur




Related Photos