महत्वाच्या बातम्या

 किन्हाळा ग्रामपंचायत येथे आधार केंद्र सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील ग्रामीण भागातील किन्हाळा ग्रामपंचायत येथे नुकतेच शासकीय आधार नोंदणी केंद्र सुरू झाले आहे. आसपासच्या गावातील नागरिकांना आधार विषयीची कामे करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. ज्यामुळे वेळ व पैसाचा दुरूयोग होत होता. तरी सुद्धा आधार बाबत काम होत नव्हते, त्यामुळे किन्हाळा ग्रामपंचायत मध्ये शासकीय आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील आसपासच्या गावातील नागरिकांना नवीन बालकांचे आधार कार्ड काढणे, नाव, पत्ता, जन्म तारीख दुरुस्ती, आधार मध्ये मोबाईल नंबर टाकने, ईमेल आयडी टाकने, आधार कागदपत्रे अपडेट करने व आधार डाऊनलोडची कामे होणार आहेत. सदर केंद्र सोमवार ते शनिवार नियमित सुरू राहणार असल्याचे आधार आपरेटर मोरेश्वर शेंडे यांनी सांगितले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos