महत्वाच्या बातम्या

 तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे लाच रक्कम स्विकारतांना अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील बेतकाठी ता. कोरची येथील टिप्पर, ट्रक्टर ने तलाठी कार्यालय बेतकाठीच्या कार्यक्षेत्रातुन गिट्टी खदान माल वाहतुक करण्याच्या कामाकरिता १५ हजाराची लाच रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. नरेंद्र रामचंद्र ठाकरे (४४) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. सदर कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारास आरोपी नरेंद्र रामचंद्र ठाकरे (४४) रा. छत्तीसगढ मोहल्ला, ता. कोरची, जि. गडचिरोली, मुळ पत्ता  रा. आंबेडकर वार्ड, मु.पो. गणेशपुर, ता. जि. भंडारा यांनी १० ऑक्टोबर २०२२ रोजी सोडलेल्या टिप्परचे १०  हजार रु. व टिप्पर, ट्रक्टर ने तलाठी कार्यालय बेतकाठीच्या कार्यक्षेत्रातुन गिट्टी खदान माल वाहतुक करण्याच्या कामाकरिता मासिक रु. १० हजार असे एकुण २० हजार रूपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली. तक्रारीची शहानिशा करून सापाळा रचला असता १५ हजार रु. लाच स्विकारतांना व आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने १५ हजार मौजा तलाठी, साजा क्रमांक ९, तलाठी कार्यालय बेतकाठी येथे लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन कोरची येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीचे पोनि शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पो.ना. राजेश अंमलदार यांचे नाव पदमगिरवार, पो.ना. श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, पोशि संदिप घोरमोडे, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos