महत्वाच्या बातम्या

 नुगुर गावाला लागून असलेल्या इंद्रावती नदीवरील पूल बांधकामाला विरोध


- लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील नुगुर या गावाला लागून असलेल्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड शासनाकडून पूल निर्माण कार्य पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. हा परिसर आबुजमाड क्षेत्रात येतो, या परिसरातील आदिवासी नागरिकांचा या पूल निर्माण कार्यबाबत असे म्हणणे आहे की शासनाने आजपर्यन्त दवाखाना, शाळा, अंगणवाडी, शुद्ध पाण्याचे सुविधा, सि. सि. रोड नाली, वीज, घरकुल इत्यादि सुविधा पैकी एकही सुविधा व मूलभूत गरज पूर्ण केली नाही. अचानक या भागातील नागरिकांशी चर्चा न करता पूल बांधकाम करून पोलिस कॅम्प लावून हा क्षेत्र खदान कंपनीला देऊन जल जंगल जमीन नष्ट करू शकतात. या भीतीमुळे या भागातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अनेक गावातील नागरिक इंद्रवती नदीपात्रात लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलणासाठी बसले आहे, या आंदोलनाला भारतीय कम्यूनिस्ट पार्टी एटापल्ली कडून कॉमेड सचिन मोतकुरवार यांनी समर्थन दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व कम्यूनिस्ट कडून हा मुद्दा शासनाला लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. ग्रामसभा कडून ॲड. लालसू नागोटी या आंदोलनाचे काम पाहत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos