महत्वाच्या बातम्या

 शिष्यवृत्ती परीक्षेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल भरारी


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवा गौरव प्राप्त करून दिला आहे. विद्यालयातील संस्कार नागपुरे, राघव भांडेकर, प्रेम कुनघाडकर आणि यथार्थ शेंडे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, पालकांचे प्रोत्साहन तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संतोष कुळमेठे, भूपेंद्र चौधरी, शाहिद शेख, शाहदुल्ला खान आणि रमण गागापूरवार यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत सातत्याने परिश्रम घेतले.

विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करून विद्यालयाचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गोंडवाना सैनिकी विद्यालय हे शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून भविष्यातही असेच यश संपादन करण्याचा विश्वास विद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos