महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१९ जानेवारी )

१९ जानेवारी १८३९ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

१९ जानेवारी १९०३ : अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१९ जानेवारी १९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९ जानेवारी १९४९ : पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

१९ जानेवारी १९४९ : क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९ जानेवारी १९५४ : कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

१९ जानेवारी १९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

१९ जानेवारी १९६६ : भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

१९ जानेवारी १९६८ : पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९ जानेवारी १९८६ : (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९ जानेवारी १९९६ : ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

१९ जानेवारी १९९६ : प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

१९ जानेवारी २००६ : नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

१९ जानेवारी २००७ : सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

जन्म (१९ जानेवारी )

१९ जानेवारी १७३६ : वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

१९ जानेवारी १८०९ : अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९)

१९ जानेवारी १८८६ : हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

१९ जानेवारी १८९२ : विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

१९ जानेवारी १८९८ : मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)

१९ जानेवारी १९०६ : चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

१९ जानेवारी १९२० : संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

१९ जानेवारी १९३६ : बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)





  Print






News - todayspecialdays




Related Photos