बंगालमध्ये भाजपचे शुभेन्दु अधिकारी विजयी : अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराभव


- ममता बॅनर्जी यांना आपला गड राखण्याच अपयश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांनी ममता दीदींना पिछाडीवर टाकत मोठा विजय मिळवला आहे.
राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण वाघीण गेली अशी स्थिती झाली आहे.
ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला असला तरी पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचे दिसते. नंदीग्राममध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली.
शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. याआधी ममता बॅनर्जी यांचा 1200 मतांनी विजय मिळवला असल्याबाबत एएनआयनं माहिती दिली होती. त्यामुळं ममता यांचा विजय झाला असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-05-02


Related Photos