परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले


वृत्तसंस्था / औरंगाबाद :   राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे एका पत्रकार परिषदेत बेताल वक्तव्य करून रापम कर्मचाऱ्यांची खिल्ली उडविली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे झाले आहेत असे धक्कादायक विधान रावते यांनी केले आहे.  
औरंगाबादमध्ये शहरांतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान एक करार करण्यात आला. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रावतेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे बेताल विधान केले. एसटी महामंडळामध्ये पगाराचे, कामाचे असे अनेक प्रश्न असल्याचे सांगत पत्रकरांनी प्रश्न विचारला असताना रावतेंनी    एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत. आणि ते एवढे वाढले आहेत की तेच आता वेडे झाले आहेत. आणि मी हे अधिकृतपणे बोलतोय असं उत्तर  दिले. या वक्तव्यामुळे रावतेंवर चहूबाजूने टिका होताना दिसत असून यामधून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-11


Related Photos