महत्वाच्या बातम्या

 उमाकांत पारधी यांच्या नवजात बालकाला जन्मतः मिळाले आधार कार्ड


- आधार ऍट बर्थ उपक्रमाचा शुभारंभ

- जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : प्रशासनाच्या एका चांगल्या उपक्रमाला सुरुवात झाली. नाका डोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उमाकांत पारधी व सौ.लता पारधी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या पहिल्या बालकाची जिल्ह्यातील पहिले आधार ऍट बर्थ नुसार जन्मतःच आधार मिळणारे पहिले बालक म्हणून जिल्ह्यात नोंद झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकार यांनी आरोग्य केंद्रातच प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांना आधार कार्ड देण्याचा उपक्रमाविषयी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम राबविण्यासाठी नुकताच आढावा घेतला होता.

आधार म्हणजे सर्व शासकीय योजनासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमधील एक महत्त्वाचे कागदपत्र असून आधार कोणत्याही योजनेचा लाभ घेतांना आधार कार्ड असणे गरजेचे असते. ते लक्षात घेता जिल्हाधिकारी महोदयांनी पदाची सूत्र घेताच आधार ऍट बर्थ या उपक्रमाविषयी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा व्यवस्थापक आयटी यांच्यासोबत सलग तीन बैठका घेऊन या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले. त्यानुसारच नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पारधी दांपत्याच्या बालकाला जन्मतः आधार कार्ड देण्यात आले. जिल्ह्यातील या उपक्रमातील हे पहिले आधार कार्ड असल्याने याची विशेष महत्त्व आहे. मात्र तरी देखील पालकांनी ग्रामीण ग्रामीण तसे खाजगी रुग्णालयात रुग्णालयात जन्मताच आपल्या पाल्यांना आधार कार्ड मिळण्याची मिळण्याची प्रक्रिया करून घेण्यासंबंधी देखील जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आवाहन केले आहे

सौ.लता पारधी यांची  नैसर्गिक प्रसूती असून जन्मता बालकाचे वजन २ . ३०० किलोग्रॅम आहे. नाका डोंगरी प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र नाका डोंगरी येथे लता उमाकांत पारधी यांच्या नवजात बालकाच्या जन्माची ऑनलाईन नोंदणी करून पोस्ट ऑफिस नाका डोंगरी मार्फत आधार कार्ड जनरेट करण्यात आले. या आधारचा क्रमांक 2981/100073/00005/31/12/2021  आहे .या आधार कार्ड नोंदणी करता प्राथमिक आरोग्य केंद्र नाका डोंगरी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि.डी गिरीपुंजे व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमामुळे  माझ्या बाळाचे जन्मताच आधार कार्ड मिळाले, या सुविधेबद्दल मी समाधानी आहे. असे उमाकांत पारधी यांनी व्यक्त केले. 





  Print






News - Bhandara




Related Photos