महत्वाच्या बातम्या

 भवानजीभाई चव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना नशामुक्तीची शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत सरकार आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या नशामुक्त भारत अभियान व मिशन स्पंदन अंतर्गत भवानजीभाई चव्हाण विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या व्यसनांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याबाबत जनजागृती करण्यात आली. व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून निरोगी, सुदृढ आणि सशक्त समाजनिर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

प्रजापिता ब्रह्माकुमारीज चंद्रपूर केंद्राच्या संचालिका कुंदा दीदी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली. व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासोबतच इतरांमध्येही व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जे. एम. टोंगे, उपप्राचार्य मुप्पिडवार पर्यवेक्षक जवादे, पर्यवेक्षक कहार्डिंगे, प्रजापिता ब्रह्माकुमारीज चंद्रपूर विभागाचे मार्गदर्शक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या संकल्पातून नशामुक्त भारत घडविण्यासाठी युवा पिढीची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला.





  Print






News - Chandrapur




Related Photos