१३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : १७ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा ही २० ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राहुरी जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हातील १७ वर्षाखालील मुला/मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोकमान्य टिळक हायस्कुल, जिल्हा स्टेडीयम होणार आहे.
खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० नंतरचा असावा. (जन्म दाखला आवश्यक). निवड चाचणी करीता स्वत:ची किट आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो- २ अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अहवान टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव विशाल चव्हाण यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




