महत्वाच्या बातम्या

 जिल्हयातील ३८४ महाविद्यालयांना ऑनलाईन वेबिनारद्वारे जात पडताळणीचे मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे मंडणगड योजना प्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हयातील ३८४ शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि नोडल अधिकारी यांच्यासाठी ऑनलाईन बेबिनार २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी ४ टप्यात आयोजित करण्यात आला.

वेबिनारमध्ये मंडणगड पॅटर्नप्रमाणे ११ वी व १२ वी चे अर्ज मुदतीत सादर करणे, नोडल अधिकारी यांची भूमिका काय याबाबत समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे व उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये समता पर्व आणि मंडणगड योजनांविषयी माहिती देण्यात आली व समस्यांचे निराकरण करण्यात आले. या वेबिनारला जिल्हयातील ३८४ महाविद्यालयातील नोडल अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने वर्ग १२ वी व ११ विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता प्रस्ताव पाठविणेबाबत तसेच ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र सुलभरितीने कसे प्राप्त करावे. याविषयी नागपूर जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

Facebook    Twitter      
  Print


News - Nagpur | Posted : 2022-11-28
Related Photos