महत्वाच्या बातम्या

 जांभूळघाट येथे गोवंश तस्करीवर धाड : १२ बैलांची सुटका, चार पिकअपसह सात आरोपी ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिसी पोलीस स्टेशन हद्दीतील जांभूळघाट नेरी टी-पॉईंट येथे पहाटे सापळा रचून गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. या कारवाईत १२ बैलांची सुटका करण्यात आली असून चार पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, गोवंशांची कत्तलीकरिता अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात आहे. त्यानुसार १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जांभूळघाट नेरी टी-पॉईंट येथे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयित चार पिकअप वाहने अडवून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान एमएच ४० एके १०३६, एमएच ३४ एव्ही १५८०, एमएच ४० वाय ७५९४ आणि एमएच ३४ बीजी ६७८१ या क्रमांकाच्या वाहनांमध्ये १२ गोवंश (बैल) अत्यंत क्रूरपणे, चारा-पाण्याविना कोंबून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गोवंशांची सुटका केली.

या प्रकरणी दीपक योगराज कांबळे रा. किटाली, ता. लाखनी, मधुकर सोमाजी समरत रा. काथुर्ली, ता. पवनी, हरिदास तुकाराम माहुरे रा. भावड, ता. पवनी, राजहंस आत्माराम नागपुरे रा. पाथरी, ता. पवनी, राजकुमार दाजीराव मारबते रा. पाथरी, ता. पवनी, चैतन्य विठ्ठल गजापुरे रा. विरली खंदार, ता. पवनी आणि गंगाधर रामकृष्ण मस्के रा. काथुर्ली, ता. पवनी, सर्व जि. भंडारा येथील आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान चार पिकअप वाहने आणि १२ गोवंश असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना तपोवनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गोशाळा, गोंदेडा, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे सुरक्षित दाखल करण्यात आले आहे.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार नितीन कुर्जेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, दिनेश आदापुरे,पोलीस अंमलदार अमोल सावे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos